🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: वॉचमनने दारूच्या नशेत केला बांधकाम मजुराचा खून

नाशिक: वॉचमनने दारूच्या नशेत केला बांधकाम मजुराचा खून

नाशिक (प्रतिनिधी): म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील वाढणे कॉलनीतील हनुमान मंदिराजवळ बांधकाम सुरू असलेल्या साइटवर काम करणाऱ्या वॉचमन व बिगारी यांच्यामध्ये दारूच्या नशेत झालेल्या वादातून बिगाऱ्याचा खून झाल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितास ताब्यात घेतले आहे.

🔎 हे वाचलं का?:  उत्तर महाराष्ट्रात चार दिवस ढगाळ हवामान, तुरळक पावसाची शक्यता

याबाबत अधिक माहिती अशी की, म्हसरूळ शिवारातील वाढणे कॉलनीतील हनुमान मंदिराजवळ सुरू असलेल्या बांधकाम साइटवरील वॉचमन आणि बिगारी यांच्यात गुरुवारी (ता.३) रात्री दारूच्या नशेत वाद झाले होते.

या बांधकाम साइटवर वॉचमन म्हणून काम करणाऱ्या संशयित योगेश डंबाळे (२७, हल्ली मुक्काम नाशिक, मुळ रा. ननाशी, जि. नाशिक) यांनी मयत सतलाल मुकूरी प्रसाद (४०, हल्ली मुक्काम नाशिक, रा. नाहर छापला पडरोना कुशीनगर, उत्तर प्रदेश) यास बहिणीकडे वाईट नजरेने बघतो, म्हणून शाब्दिक वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी ध्वजस्तंभ व पताका रचना आढावा बैठक

संशयित योगेश याने मृताच्या डोक्यात पाठीमागून जड हत्याराने वार केला. मयत सतलाल साइटवर असलेल्या लाकडी बल्ल्यांच्या ढिगाऱ्यावर पडला. डोक्याच्या मागच्या बाजूला जबर मार लागल्याने मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त गंगाधर सोनवणे, वरिष्ठ निरीक्षक अशोक साखरे, म्हसरूळ गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली. परंतु, वेळीच सतपाल प्रसाद यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असते, तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790