
नाशिक : वडील रागावल्याचा राग आल्याने १४ वर्षाच्या मुलीने केली आत्महत्या
नाशिक (प्रतिनिधी): वडीलांनी चौदा वर्षांच्या मुलीला प्रसाद कमी खा, असे रागावल्याने तिने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
श्रद्धा दिलीप कापरे (वय: १४, रा. संभाजीनगर, सातभाई संकुलच्या पाठीमागे, दसक, जेलरोड)) असे मृत मुलीचे नाव आहे.
श्रद्धाचे वडील दिलीप कापरे यांनी त्र्यंबकेश्वर येथून प्रसाद आणला होता
तो प्रसाद सर्व खात असताना श्रद्धाने तो जरा जास्त घेतला. त्यामुळे तिचे वडील तिच्यावर रागावले. यामुळे तिला वाईट वाटले. यातूनच तिने घरी असताना विषारी औषध पिले. घटना लक्षात येताच तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिस नाईक चव्हाण तपास करत आहेत.
नाशिक जिल्ह्यात मेडिकल दुकानांमध्ये महिन्याभरात लावावे लागणार सीसीटीव्ही.. हे आहे कारण…
चांगली बातमी: पंचवटी एक्स्प्रेसचे इतके डबे आता होणार जनरल