नाशिक: वडिलांचे श्राद्ध करून परततांना कारचा अपघात; एकाच कुटुंबातील २ ठार, २ जखमी

नाशिक: वडिलांचे श्राद्ध करून परततांना कारचा अपघात; एकाच कुटुंबातील २ ठार, २ जखमी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्हयातील त्रंबकेश्वर येथे वडिलांचे श्राद्ध करून परतीचा प्रवास करत असताना क्रीपाल सिंग परिवाराचा अपघात झाला आहे.

गुरुवारी सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास वाडीव्हरे येथे हा अपघात झाला आहे.

अधिक माहिती अशी की, हरपित क्रीपालसिंग वय 32, (राहणार उळवे जिल्हा रायगड), परमजित क्रीपालसिंग (वय 24), मनमित क्रीपालसिंग (वय 29) आणि शरणजित कौर (वय 23) सर्व राहणार नेरुळ नवी मुंबई येथे वास्तव्यास आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

क्रीपालसिंग परिवार वडिलांचे श्राद्ध करण्यासाठी बुधवारी त्रंबकेश्वर येथे आले होते. बुधवारी वडिलांचे श्राद्ध करून गुरुवारी पहाटे ते मुंबईला रवाना झाले होते.

त्रंबकेश्वर येथून मुंबई कडे जात असताना वाडीव्हरे शिवारातील रायगड नगर येथे पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास क्रीपालसिंग परिवाराची कार ट्रकला मागून जाऊन धडकली असल्याचा अंदाज आहे. हा अपघात इतका मोठा होता की कारचा पुढचा संपूर्ण भाग चेपला गेला होता. या अपघातात गाडीत असलेले चारही जण गंभीर जखमी झाले होते. यात परमजित क्रीपालसिंग यांचा जागीच मृत्यू झाला तर हरपित क्रीपालसिंग यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर मनमित क्रीपालसिंग व शरणजित कौर दोघंही गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

घटनेची माहिती मिळताच वाडीव्हरे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि महामार्ग पेट्रोलिंग कर्मचारी यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय अहिरे आणि पोलीस कॉन्टेबल तुषार खालकर अधिक तपास करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790