नाशिक: लासलगावला टॉवर वॅगन ट्रेनने उडवल्याने ४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

नाशिक: लासलगावला टॉवर वॅगन ट्रेनने उडवल्याने ४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातील लासलगावमध्ये ४ रेल्वे कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

लासलगाव – उगाव रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे.

सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. रेल्वे कामगारांचा मृत्यूने स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

टॉवर (लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन) रॉग डायव्हरशने लासलगाव बाजूने उगावकडे जात होते. किमी 230 व पोल नंबर 15 ते 17 मधी ट्रॅक मेंटन (ब्लॉक तयारी) करण्याचे काम सुरू होते.

सदर काम खालील ट्रक मेंटेनर कर्मचारी काम करत असतांना त्यांना रेल्वे लाईनची मेंटनेस करणारे टॅावरने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात जबर मार लागण्याने चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

मृतांची कर्मचाऱ्यांची नावे: 1) संतोष भाऊराव केदारे (वय 38 वर्षे), 2) दिनेश सहादु दराडे (वय 35 वर्षे), 3) कृष्णा आत्मराम अहिरे (वय 40 वर्षे), 4) संतोष सुखदेव शिरसाठ वय 38 वर्षे.

लासलगाव येथे ठार झालेल्या चार कर्मचारी यांच्या निषेधार्थ रेल्वे कर्मचाऱ्यांनी लासलगाव रेल्वे स्थानकावरील रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले.  त्यामुळे नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी मुंबईकडे जाणारी गोदावरी एक्सप्रेस १० मिनिटे रोखण्यात आली. रेल प्रशासन मुर्दाबाद, ट्रॅकमन एकता झिंदाबाद अशा घोषणा कर्मचाऱ्यांनी दिला. दुर्घटना घडून तीन तास घडले तरी वरिष्ठ अधिकारी न आल्याने कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790