Live Updates: Operation Sindoor

नाशिक: लहान मुलांच्या अपहरणाचा ‘फेक मॅसेज’, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांकडून आवाहन

नाशिक: लहान मुलांच्या अपहरणाचा ‘फेक मॅसेज’, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांकडून आवाहन

नाशिक (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांच्या अपहरणाच्या अफवांनी महाराष्ट्रात अनेक घटना घडल्या.

आता राज्यात बालक चोर टोळीच्या नावाने पसरलेली अफवा नाशिकपर्यंत पोहोचली आहे.

त्यामुळे नाशिकच्या पालकांमध्ये दहशत असून पालकांची कशी झोप उडाली आहे.

मात्र ही अफवा असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून याबाबत अद्याप कोणताही तक्रार दाखल नसल्याचे सांगण्यात आले आहे.

👉 हे ही वाचा:  महावितरणच्या नाशिक मंडळ अधिक्षक अभियंतापदी राजेश थूल रुजू

तसेच अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच अशा पद्धतीचे फेक मॅसेज शेअर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे.

अशाच गैरसमजातून नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी फेरीवाल्याला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर आता दोन दिवसांपासून लहान मुलांचे अपहरण झाल्याचे मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे नाशिकला पालकांमध्ये काळजीचे वातावरण आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक परिमंडळात सेवा पंधरवड्याच्या पहिल्या आठवड्यात १ हजार ४०२ नवीन वीजजोडण्या

नाशिक शहरातील अडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कोणार्क नगर येथून लहान मुलांचे अपहरण झाल्याचा अफवेचा मॅसेज सोशल मीडियात फिरतो आहे. अनेकांनी हा हा फेक मेसेज आपल्या Whatsapp स्टेटसवर देखील ठेवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून असे मॅसेजेस सोशल मिडीयात व्हायरल होत असून पोलिसांच्या तपासात ही अफवा असल्याचं समोर आले आहे. पोलिसही यामुळे वैतागले आहेत. आहेत. अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये त्याचप्रमाणे अशा प्रकारचे फेक मेसेजेस फॉरवर्ड करू नका आणि आपल्या स्टेटसवर सुद्धा ठेवू नका. कुठलीही शंका असल्यास पोलिसांशी थेट संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच खोटे मॅसेज व आणि अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा नाशिक पोलिसांनी दिला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790