नाशिक: मुंबई-आग्रा महामार्गावर कारचा अपघात; चार जण जखमी

नाशिक: मुंबई-आग्रा महामार्गावर कारचा अपघात; चार जण जखमी

नाशिक (प्रतिनिधी): आग्रा महामार्गावर आज दुपारी जलसा हॅाटेलजवळ मारुती गाडी पलटी होऊन अपघात झाला. या मारुती कंपनीच्या वाहनाचा क्रमांक MH02 CP2996 हा आहे.

या अपघातात शिरपूर येथील चार जण जखमी झाले असून त्यात सायली तारकेश दिक्षित (३०), ओमकार तारकेश दिक्षित (८), अरविंद मनोहर जोशी (६०), आशा अरविंद जोशी (५५) यांचा समावेश आहे. या अपघाताची माहिती फोनवर मिळताच शिरवाडे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत अॅम्बुलन्स लगेचच अपघात स्थळी पोहोचली. त्यानंतर पेशंटला ओम् हॅास्पिटल पिंपळगाव येथे दाखल करण्यात आले.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिकमधील ‘या’ तीन खासगी शाळा बंद करण्याचा निर्णय: पालकांची फसवणूक
Breaking: नाशिकमध्ये ‘या’ खासगी सावकारी करणाऱ्या महिलेच्या घरावर छापा!
नाशिक: आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे वाचले 18 वर्षीय तरुणाचे प्राण ! (व्हिडीओ बघा)

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here