नाशिक: “माझे फोन रिसिव्ह का करीत नाहीस? ”म्हणत जुन्या मित्राने केला विवाहितेचा विनयभंग

नाशिक: “माझे फोन रिसिव्ह का करीत नाहीस?”म्हणत जुन्या मित्राने केला विवाहितेचा विनयभंग

नाशिक (प्रतिनिधी): लग्नानंतर विवाहित महिलेचा पिच्छा पुरवून जुन्या मित्राने तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे.

विवाहित महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग करणार्‍या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही तिच्या माहेरी आली होती.

तिच्या लग्नाअगोदरचा मित्र संशयित ओम्कार अरुण आव्हाड याने तिला अडविले.

“तू माझ्याशी का बोलत नाहीस,” असे म्हणत पीडितेच्या घराबाहेर चकरा मारू लागला. फिर्यादी महिला बाहेर कुठे जाण्यासाठी निघाली असता आव्हाड हा तिचा पाठलाग करीत होता. ही महिला रो-हाऊसच्या बाहेर उभी असताना आरोपी ओम्कार आव्हाड हा तेथे आला व म्हणाला, “तू माझे फोन रिसिव्ह का करीत नाहीस?” असे म्हणून तिला जवळ ओढले, तसेच स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.दरम्यान याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ओम्कार आव्हाड याला अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास पोलीस हवालदार चौधरी करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790