नाशिक महानगरपालिका आयुक्त रमेश पवार यांची बदली..

नाशिक महानगरपालिका आयुक्त रमेश पवार यांची बदली..

नाशिक (प्रतिनिधी): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारला मोठा दणका दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारने नाशिक महापालिका आयुक्तपदी रमेश पवार यांची नियुक्ती केली होती.

आता शिंदे सरकारने पवार यांची बदली केली आहे.

पवार हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे तथा मातोश्रीशी अतिशय निकटचे संबंध ठेऊन असल्याचे सांगितले जाते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव कारच्या धडकेत महिला ठार

करोना काळात चांगली कामगिरी करणाऱ्या कैलास जाधव यांची बदली झाल्यानंतर २४ मार्च २०२२ रोजी रमेश पवार यांची नाशिकच्या मनपा आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. नाशिक महापालिकेचा कार्यकाळ संपल्यामुळे प्रशासक म्हणून रमेश पवार यांनी कार्यभार हाती घेतला. तेव्हापासून नाशिक शहरातील अनेक कामांचा धडाका त्यांनी लावला होता.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: सरकारी अधिकारी असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकाचा दीड तोळ्याचा सोन्याचा गोफ लांबवला

नाशिक मनपा आयुक्तपदाची धुरा आता डॉ. चंद्रकांत पुलकुंडावर यांच्याकडे देण्यात आली आहे. ते शिंदे यांचे विश्वासू असल्याचे सांगितले जाते. पुलकुंडावर हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ येथे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. उद्या किंवा परवा ते तातडीने आयुक्तपदाचा पदभार घेणार असल्याचे समजते.

⚡ हे ही वाचा:  चार दिवस पावसाचे: हवामान विभागाकडून अलर्ट जारी.. 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट !

मनपा आयुक्तांची बदली म्हणजे शिंदे सरकारकडून मविआ सरकारला मोठा दणका मानला जात आहे. मध्यंतरी सरकार बदलल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्याचे बोलले जात असतानाच ज्या अधिकाऱ्यांनी सोयीच्या बदल्या करून घेतल्या आहेत. अशा अधिकाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790