नाशिक: बायको नांदायला येत नव्हती, म्हणून रागाच्या भरात दाजीनेच केला साल्याचा खून
नाशिक (प्रतिनिधी): पत्नीच्या घरची मंडळी बायकोला सहा महिन्यांपासून परत पाठवत नसल्याने रागाच्या भरात दाजीने साल्याचा डोक्यात दगड घालून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे…
पोलिसांनी दाजीला अटक केली आहे.
याप्रकरणी महिलेने दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
साला दीपक जनार्दन जाधव (वय 22, रा.तळेगाव, ता. दिंडोरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर दाजी शरद लहानू पवार (रा.गोरक्षनगर, पंचवटी, मूळ रा. वडगाव, ता. सिन्नर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दीपक जाधव यांच्या बहीण व दाजी शरद पवार यांच्यात कौटुंबिक वाद सुरु आहेत. त्यातून सहा महिन्यांपूर्वी त्यांची बहीण माहेरी निघून आली होती. बायकोने परत नांदायला यावे, यासाठी शरद पवार सासरच्या मंडळींशी संपर्क साधत होते. तरीही, सासरी मंडळी बायकोला पाठवत नव्हते. शिवाय, बायकोचा भाऊ दीपक पवार नांदायला पाठवत नव्हता.
त्याचा राग शरद पवार यास आला. त्याने दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथील सार्वजनिक वाचनालयाजवळ साला दीपक यास भेटण्यास बोलवले. या ठिकाणी दोघांनी दारुची पार्टी केली. त्यानंतर शरद पवार याने साल्याचा डोक्यात दगड घालून खून केला.
मृतदेह सार्वजनिक वाचनालयाजवळील झुडपांमध्ये असल्याची माहिती मिळताच पोलीस पाटील रोशन परदेशी यांनी दिंडोरी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी पोलीस पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक माधुरी कांगणे, कळवण उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड, पेठ विभागाच्या फडताळे यांनी भेट देऊन पाहणी केली. आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे अन्वेषण शाखेने तपास सुरु केला. पोलिसांनी सापळा रचून शरद पवार यास अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक चेतन लोखंडे, पांडुरंग कावळे करत आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
Breaking: नाशिक शहरातील ‘या’ नामांकित शाळेत विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ!
धक्कादायक: नाशिकला चाकूचा धाक दाखवत विवाहितेवर बलात्कार