नाशिक: बाजारासाठी गेले परत घरी आलेच नाही; कंटेनरच्या खाली दाबून मायलेकाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): सिन्नर शहरातील काही अंतरावर असलेल्या सिन्नर घोटी महामार्गावर शिव नदीवरील पुलाच्या वळणावर कंटेनरच्या खाली दाबल्या गेल्याने माय लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सोनांबे गावात शोककळा पसरली आहे.

घटनेचे सविस्तर वृत्त असे की सिन्नर घोटी महामार्गावर असलेल्या शिव नदी पुलावर गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.

सोनंबे येथील ग्रामस्थ बिलकीस अहमद शेख वय 34 आणि अरमान हमीद शेख वय १९ अशी अपघातात मृत्यू झालेल्या मायलेकाची नावे आहेत.

तालुक्यातील सोनांबे येथील मायलेक सिन्नरहून घरी परतले नसल्याचे घटना समोर आल्यानंतर. पोलिसांनी त्यांचे मोबाईल लोकेशन चेक केल्यावर ते वळणावर उलटलेल्या कंटेनर खाली दबले गेले ची धक्कादायक बाब समोर आली आहे .

या घटनेत अपघातानंतर चालक फरार झाल्याने प्रारंभिक केवळ कंटेनर उलटला असल्याचे आणि त्यात कुठलेही जीवित हानी झाली नसल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली होती दरम्यान शुक्रवारी पहाटे चार वाजता मायलेकाचा मृत्यू कंटेनर खालून बाहेर काढण्यात आला हे दोघे दुचाकी एमएच १५ बीएफ ४९ १९ वरून गुरुवारी दुपारी सिन्नर येथे बाजारासाठी आले होते.

त्यांनी कुटुंबीयांना सिन्नर इथून निघाल्याची मोबाईलवरून सांगितले होते दरम्यान रात्री उशिरापर्यंत ते घरी ना परतल्याने कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांनी त्यांचा मोबाईल ट्रॅक केला असता रात्री दहा वाजेच्या सुमारास मोबाईलचे लोकेशन शिवनदीच्या वाहनावर उलटलेल्या कंटेनरच्या परिसरात मिळाले.

पोलिसांचा संशय बळकावला दुचाकी या कंटेनर खाली दाबली असावी असे संशय व्यक्त करत पुढे तपास करायला सुरुवात केली. उशिरा क्रेन बोलावून कंटेनर आणि त्यातून पडलेले पुठ्ठ्यांचे गठ्ठे बाजूला करण्याचे काम हाती घेतले शुक्रवारी पहाटेच्या समस्या कंटेनर खाली दुचाकी दोघा मायलेक आढळून आले या घटनेमुळे परिसरात हळहळ पसरली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790