🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: बहिणीच्या अल्पवयीन मैत्रिणीचा विनयभंग; एकाला अटक

नाशिक: बहिणीच्या अल्पवयीन मैत्रिणीचा विनयभंग; एकाला अटक

नाशिक (प्रतिनिधी): पीडितेच्या भावाला पकडून ठेवण्याचे खोटेच सांगून शाळेजवळ बोलावून घेतलेल्या अल्पवयीन पीडितेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांविरोधात उपनगर पोलिसात पोक्सो कायद्यांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मुख्य संशयिताला अटक करण्यात आली असून पीडित मुलगी ही संशयिताच्या बहिणीची मैत्रिण आहे.

आनंद मुरलीधर धोंगडे (रा. आम्रपाली झोपडपट्टी, कॅनॅल रोड, जेलरोड) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य संशयिताचे नाव असून, त्याचे दोन साथीदार पसार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गोदावरी जन्मोत्सवानिमित्त आज (दि. ३१) शहरातील 'या' वाहतूक मार्गात बदल

पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आनंद हा पीडित अल्पवयीन मुलीच्या मैत्रिणीचा भाऊ आहे. संशयित आनंद व त्याच्या दोन साथीदारांनी गेल्या शुकव्रारी (ता. 11) सकाळी अकरा वाजेच्यासुमारास के. जे. मेहता स्कूलच्या बाजूला असलेल्या साई बाबा मंदिरामागे पीडितेला तिच्या भावाला पकडून ठेवल्याचे खोटे सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रेल्वे लेव्हल क्रॉसिंग व्यवस्थापनासाठी कुंभमेळा प्राधिकरणाकडून संयुक्त सर्वेक्षणांना सुरुवात

त्यामुळे पीडिता घाबरली आणि क्षणाचाही विलंब न करता भावाला पाहायला तिथे पोहोचली. त्यावेळी संशयित आनंद याने हा सर्व बनाव रचल्याचे तिच्या लक्षात आले. त्यावेळी संशयितानंद याने पीडितेचा हात पकडून शाळेत जाण्यापासून अडविले. तसेच, तु माझ्याशी का बोलत नाहीस, मला ब्लॉक का केले असे बोलून तिचा विनयभंग केला.

या दरम्यान सुदैवाने एका शालेय बस चालकाचे लक्ष गेल्याने त्याने धाव घेतली. त्याला बघून तिघा संशयितांनी दुचाकीवरून पसार झाले. पीडित मुलीने सदरचा प्रकार शाळेच्या शिक्षिकेला सांगितला. यानंतर शिक्षिकेने मुलीच्या पालकांशी मोबाईलवरून संपर्क साधून माहिती दिली. पालकांनी शाळेत धाव घेतली आणि मुलीसह उपनगर पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी उपनगर पोलिसात पोस्को अन्वये विनयभंगांचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आनंद यास अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक चौधरी हे तपास करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790