नाशिक: फेसबुकवर झालेल्या भांडणातून केली होती युवकाची हत्या; ‘या’ तिघा आरोपींना जन्मठेप!

नाशिक: फेसबुकवर झालेल्या भांडणातून केली होती युवकाची हत्या; ‘या’ तिघा आरोपींना जन्मठेप!

नाशिक (प्रतिनिधी): फेसबुकवर झालेल्या भांडणाच्या रागातून युवकावर चाकूने वार करत त्याची हत्या केल्याप्रकरणी तिघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

योगेश ऊर्फ घाऱ्या राजेंद्र जाधव (वय २०, रा. जय मल्हार निवास, राजपूत कॉलनी, वडनेर दुमाला), सुमीत संजय दिंडोरकर (वय २१, रा. गणेश चौक, सिडको), राजरत्न ऊर्फ राष्ट्रपाल नरवाडे (वय २३, रा. आनंदनगर, पाथर्डीफाटा) असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या संशयिताला बेड्या !

११ मे २०१५ रोजी पाथर्डी फाटा येथे फेसबुकवर झालेल्या भांडणाची कुरापत काढून आरोपी योगेश, सुमीत, राजरत्न आणि तुषार ऊर्फ बंटी अनिल तायडे या चौघांनी आनंद संजय खणके (वय २१) यास बेदम मारहाण करत त्याच्यावर चाकूने वार ठार मारले होते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: मोटारसायकल स्लिप होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10391,10389,10387″]

तत्कालीन सहाय्यक निरीक्षक आर. डी. गवळी यांनी तपासाची चक्र फिरवित योगेश जाधव, सुमीत दिंडोरकर, राजरत्न नरवाडे व तुषार तायडे या सर्वांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास करत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते.

शुक्रवारी (ता.८) या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालया न्यायाधीश (क्रमांक २) मृदुला.व्ही. भाटिया यांच्या न्यायालयात झाली असता न्यायाधीश यांनी आरोपींविरुद्ध फिर्यादी, पंच, साक्षीदार यांनी दिलेली साक्ष व तपासी अधिकारी यांनी सादर केलेले सबळ पुरावे ग्राह्य धरुन योगेश जाधव, सुमीत दिंडोरकर आणि राजरत्न नरवाडे यांना जन्मठेपेची शिक्षा व ३० हजार रुपये दंड ठोठावला. ॲड. दीपशिखा भिडे सरकारी पक्षातर्फे यांनी काम पाहिले.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here