Live Updates: Operation Sindoor

नाशिक: फादर्स डे साजरा करण्यासाठी तलवारीने केक कापला.. आता रवानगी थेट तुरुंगात…

नाशिक: फादर्स डे साजरा करण्यासाठी तलवारीने केक कापला.. आता रवानगी थेट तुरुंगात…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमधील एका इसमाला फादर्स डे निमित्त केक तलवारीने कापणे एका इसमास चांगलेच महागात पडले आहे.

सेलिब्रेशन तर झालं, मात्र तलवारीने केक कापल्यामुळे पोलिसांनी या इसमावर कारवाई केली आहे…

👉 हे ही वाचा:  नाशिक: केटीएचएम कॉलेज येथे आज (दि. ७ मे) झालेल्या मॉक ड्रिलची क्षणचित्रे…

पंचवटीतील फुलेनगर भागात राहणाऱ्या या इसमावर कारवाई करण्यात आली आहे.

पंचवटीतील फुलेनगर भागातील शांताराम देवराम गुरगुडे (वय 44) याने फादर्स डेच्या दिवशी तलवारीने केक कापून फादर्स डे साजरा केला.

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10989,10986,10980″]

👉 हे ही वाचा:  यंदा मान्सूनचे लवकर आगमन – १३ मेपूर्वी अंदमानात प्रवेश, महाराष्ट्रातही लवकर हजेरीची शक्यता

ही घटना पोलीस अंमलदार महेश साळुंके यांना समजली. त्यांनी गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विष्णू उगले, अंमलदार सुरेश मालोदे, प्रदीप म्हसदे, संदीप भांड, आसिफ तांबोळी, नाजीम खान पठाण, प्रशांत मरकड, महेश साळुंके, अण्णासाहेब गुंजाळ आदींनी त्यास ताब्यात घेतले. केक कापलेली तलवार त्याने आपल्या घरात पलंगाखाली लपवून ठेवली होती, ती काढून दिली. बेकायदा हत्यार बळगल्यावरून त्याच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790