नाशिक: प्लास्टिकचे पिस्तूल दाखवत लुटले महिला वकिलाचे मंगळसूत्र; संशयित ताब्यात
नाशिक (प्रतिनिधी): वकील महिला बाळाला दूध पाजत असताना दोन संशयितांनी प्लास्टिकची बंदूक दाखवत तिच्या गळ्यातील ४६ हजारांचे मंगळसूत्र आणि नेकलेस लुटून नेला.
मखमलाबादरोडवरील एका मंगल कार्यालयात हा प्रकार घडला.
याप्रकरणी महिलेच्या तक्रारीनुसार संशयित संदीप लक्ष्मण पाटील आणि त्याच्या अनोळखी साथीदारावर पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि अॅड. पूजा भडांगे (रा. संगमनेर) यांच्या तक्रारीनुसार, मखमलाबाद रोडवरील एका मंगल कार्यालयात लग्न समारंभासाठी आल्या होत्या.
- नवसपूर्ती करून परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला अपघात; ४ जणांचा मृत्यू; १५ जखमी
- कापडणीस पिता पुत्र हत्याकांड; पोलीस आता आणखी तीन साथीदारांच्या शोधात
हॉलमधील एक रूममध्ये बाळाला दूध पाजत असताना संशयित संदीप पाटील व त्याचा एक साथीदार रूममध्ये आला. प्लास्टिकचे पिस्तूल रोखत भडांगे यांच्या गळ्यातील ४६ हजारांचे नेकलेस व मंगळसूत्र खेचून नेले. हा प्रकार लक्षात आल्याने हाॅलमधील नागरिकांनी तत्काळ संशयिताला पकडले. पंचवटी पोलिसांना कळवले. पथकाने संशयिताला ताब्यात घेतले. साथीदार मात्र गर्दीचा फायदा घेत फरार झाला.