नाशिक पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

नाशिक पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या अंबड पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत दोन लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यासह पोलिसांनी तीन आरोपींना सुद्धा अटक करण्यात आली आहे..

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 13 मे पर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

सूरज नामदेव गायकवाड, प्रथमेश राजेश छाजेड आणि समाधान देविदास निकम असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, संशयित आरोपी सूरज नामदेव गायकवाड, प्रथमेश राजेश छाजेड या दोघांची गोपनीय माहिती सपोनि गणेश शिंदे यांना मिळाली होती. या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सुरज आणि प्रथमेश या दोघा संशयित आरोपीना ताब्यात घेतले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: RTO कडून 89 डम्पर वाहनांवर 6.5 लाख रूपयांची दंडात्मक कारवाई

या दोघांकडून पोलिसांना 46 हजार रुपयांचे 6 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल मिळून आहे. तर दोघांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तर अंबड मध्ये काही दिवसांपूर्वी मोबाईल चोरून नेण्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना समाधान निकम याची माहिती मिळाली. याही आरोपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली असून याही आरोपी कडून 168000 रुपयांचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल मिळून आले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790