नाशिक: पैशांची बॅग पळवायला आले, मात्र मुलं चोरणारे समजुन जमावाकडून चोप

नाशिक: पैशांची बॅग पळवायला आले, मात्र मुलं चोरणारे समजुन जमावाकडून चोप

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकमध्ये मुलं चोरणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवेचा मॅसेज अद्यापही शहरात फिरतो आहे.

अशातच नाशिकच्या गंजमाळ परिसरात मुलं पळविणारे समजून दोघांना जमावाने मारहाण केल्याची घटना घडली आहे.

काही वेळातच पोलिसांनी येऊन त्यांना सोडविल्याने पुढील अनर्थ टळला.

लहान मुलं चोरणारी टोळी समजून नाशिकमध्ये पुन्हा एकदा दोघांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.

नाशिकमध्ये मुलं पळवणाऱ्या टोळी सक्रिय असल्याची अफवा काही दिवसांपासून पसरत आहे. त्यामुळे प्रत्येक जण अज्ञात व्यक्तीकडे संशयाचे नजरेने पाहत आहे. अशातच नाशिकमध्ये एका चार चाकी गाडीतून पैशांची बॅग घेऊन पळण्याच्या तयारीत असणाऱ्या दोघांना मुलं चोर असल्याचे समजून बेदम मारहाण  करण्यात आली आहे. या घटनेत संशयित जबर जखमी झाले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: चोरीच्या ४ मोटार सायकलसह २ चोरटे गजाआड

नाशिक शहरातील गंजमाळ परिसरात दोघे संशयित चोरटे चार चाकी गाडीचा नंबर प्लेटवर कलर टाकून गाडीमध्ये असलेल्या बॅग पळवण्याच्या तयारीत होते. हे वाहन चालकाच्या निदर्शना झाल्यानंतर त्यांनी चोर चोर असा आरडाओरड केला. यामुळे परिसरात नागरिकांनी दोघांना पकडून ठेवले. दरम्यान परिसरातील नागरिकांनी चोर चोर ऐकून मुलं चोर असल्याचे समजून दोघे संशयितांना बेदम मारहाण केली. यात दोघे संशयित जखमी झाले असून हे दोघे भाऊ असल्याचे समजते आहे. तसेच हे दोघे औरंगाबाद येथील रहिवासी असून साहिल लक्ष्मीकुंठे आणि प्रभास लक्ष्मी कुंठे अशी या दोघा संशयितांची नावे आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: खुनातील संशयित 14 महिन्यांनंतर ताब्यात; सिडकोतील 'या' मृत्यूप्रकरणाचा उलगडा !

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली वेळेत घटनास्थळी जाऊन दोघा संशयितांना जमावाच्या तावडीतून सोडवण्यात पोलिसांना यश आले. यानंतर या दोघांना उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. मात्र ही घटना बघता नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून पसरलेल्या मुलं चोरणारी टोळी सक्रिय होण्याच्या अफवांनी नागरिकांवर किती परिणाम केला आहे हे दिसून येत आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन करण्याची वेळ पोलिसांवर वारंवार येत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790