नाशिक: पूजा करतांना अंगावर पेटता दिवा पडून जळाल्याने तरुणाचा मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): पूजा करत असतांना अंगावर पेटता दिवा पडून ९५ टक्के जळलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
नाशिकमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे.
नाशिक रोड परिसरात सिन्नर फाटा या भागात अंगावर पेटता दिवा पडल्याने उपासना करत असलेल्या एका 22 वर्षीय तरुणाचाचा मृत्यू झाला आहे.
सागर संपत खाटीकमारे असे या 95 टक्के भाजलेल्या तरुणाचे नाव आहे.
ही घटना सोमवारी (दि. 25 एप्रिल) दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास घडली होती. मात्र आज दि. 26 एप्रिल रोजी पहाटे या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
- नाशिक: चोर असल्याची अफवा; रस्ता चुकलेल्या दाम्पत्याला बेदम मारहाण; पतीला चाकू खुपसला
- नाशिक शहरातील ४ मार्गांवर महिलांसाठी सकाळ-सायंकाळी विशेष बस
- नाशिकमध्ये दोन पोलीस कर्मचार्यांना कामात अडथळा आणत लाकडी दांड्याने मारहाण
याबाबत अधिक माहिती अशी की, सागर संपत खाटीकमारे (राहणार: हरी संस्कृती बिल्डिंग, फ्लॅट नंबर 209, वय 22) हा तरुण दर सोमवारी शिव उपासाना करत असे.. मात्र सोमवार (25एप्रिल) रोजी राहत्या ठिकाणी ते उपासना करत होते. जवळच असलेला एक दिवा खाली पडला. सागर यांनी सोवळे परिधान केले होते. पेटता दिवा पडल्याने सोवळ्याने पेट घेतला. ही घटना आसपासच्या नागरिकांना कळण्याच्या आता सागर 95 टक्के भाजले गेला होता. यानंतर सागरला उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र सोमवारी पहाटे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत नाशिक रोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.