नाशिक: ‘या’ कारणामुळे फ्री फायर गेम खेळता खेळता नांदेडचा मुलगा पोहोचला नाशिकला …
नाशिक (प्रतिनिधी): मुलं आणि तरुणांमध्ये फ्री फायर या ऑनलाईन मोबाईल गेमची अत्यंत क्रेझ आहे. पण या गेममुळे मुलांमध्ये आक्रमकता, ऑनलाईनचे वेड आणि व्यसनाधीनता वाढत आहे.
काहींनी पबजी गेमच्या वेडापायी आपले प्राण गमावले तर काहींनी आपले मानसिक स्वास्थ बिघडवून घेतले. त्यामुळे गेमवर बंदी आणण्याची मागणी देशभरातून होत होती. याची गंभीर दखल घेत केंद्रानेही या गेमवर बंदी आणली.
पण आता लहान मुलं फ्री फायर गेम खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
फ्री फायर खेळायला मिळावं यासाठी बारा वर्षांच्या मुलाने घर सोडल्याची घटना घडली आहे. नांदेडमध्ये राहाणारा बारा वर्षांचा मुलगा पब्जी खेळण्यासाठी मोबाईल घेऊन घरातून निघून गेला.
हा मुलगा नांदेडला आपल्या आत्या सरूबाईकडे राहत असताना त्याची १७ वर्षाच्या करणशी मैत्री झाली. त्याच्यामुळे मोबाईलवर फ्री फायर हा गेम खेळण्याची सवय लागली. करणच्या पहिल्या आईचे निधन झाले असून त्यास एक भाऊ आहे. सावत्र आईला दोन मुले आहेत. आई वडिलांकडून त्याला त्रास नाही. त्याला आई वडिल आणि इतर नातेवाईक खर्चासाठी पैसे देतात. ते तो साठवून ठेवतो. तसेच करण दोन महिन्यांपासून नाशिकला निघून गेला, तेथे शेतीचे काम करतो. त्याची दोन महिन्यात भेट झाली नाही म्हणून नागेशने त्यास भेटण्याची इच्छा व्यक्त केली. करणने त्याला नाशिकरोडला आल्यावर भेटतो, असे सांगितले. त्याला भेटून एक दिवस थांबून नागेश पुन्हा नांदेडला आई वडिलांकडे जाणार होता. त्याच्याकडे जमा केलेले ५५० रुपये होते. त्यातून त्याने राहेर ते नरसी आणि नरसी ते नांदेड असा प्रवास केला. तेथे रेल्वे स्थानकापर्यंत आला. मात्र, रेल्वेचे तिकीट मिळाले नाही म्हणून तपोवन एक्स्प्रेसमध्ये लपत छपत त्याने प्रवास केला.
नांदेड जिल्ह्यातील बिलोरी तालुक्यातील हरनाळा येथील नागेश माधवराव जाहुरे (वय १२) हा बुधवारी सकाळी अंगणात फ्री फायर खेळत होता. मुलगा मोबाइलवर आहे हे बघून घरच्यांनीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. खेळता- खेळता तो नांदेड रेल्वेस्थानकावर पोहचला व सकाळी साडेदहाच्या नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसमध्ये बसला आणि पुढे मग घरच्यांची घालमेल सुरु झाली. सर्वत्र शोधल्यानंतरही नागेश सापडत नसल्याने घरच्यांनी अखेर रेल्वे स्थानक गाठले. रेल्वे पोलिसांना माहिती दिली. सीसीटीव्हीमध्ये १२ वर्षांचा चौकटी शर्ट घातलेला मुलगा हातात फोन घेऊन दिसला. तोच नागेश असल्याचे वडिलांनी सांगितले. पोलिसांनी तत्काळ सर्व स्थानकांवरील पोलिसांना मुलाचा फोटो आणि माहिती पाठवून दिली. अखेर बुधवारी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या दरम्यान नागेश नाशिकरोड रेल्वे पोलिसांना सापडला. एक्स्प्रेस नाशिकमध्ये पोहचल्यावर नाशिक पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेतलं. यानंतर त्या मुलाला कुटुंबांच्या स्वाधिन करण्यात आलं.