नाशिक: पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह दोन महिलांविरुद्ध गुन्हा
नाशिक (प्रतिनिधी): पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी व दोन इतर महिलांविरुद्ध देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी वंदना शेखर गायकवाड (रा. शिवशक्तीनगर, जेलरोड, नाशिकरोड) यांचा मुलगा अतुल गायकवाड (वय 39, रा. वैष्णवप्रसाद अपार्टमेंट, रा. संसरी गाव, देवळाली कॅम्प) याला संशयित रोहिणी अतुल गायकवाड (वय 40), शालिनी बागडे (वय 60) व पिंकी बागडे (वय 30, दोघेही रा. अरिंगळे मळा, सिन्नर फाटा, नाशिकरोड) यांनी काही तरी कारणावरून त्याच्याशी वाद घातला.
- नाशिक: दोन महिन्यापूर्वीच लग्न झालं, मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.. कुटुंबांवर शोककळा
- विवाहित प्रेयसीसोबत संसार थाटण्यासाठी तिच्या मुलाचे अपहरण; प्रियकराला नाशिकमध्ये अटक!
- अभिमानास्पद! सिन्नरच्या देवपूर गावातली पहिली मुलगी झाली डॉक्टर; गावकऱ्यांनी वाटले पेढे
या वादाला कंटाळून अतुल गायकवाड याने दि. 13 मार्च रोजी आत्महत्या केली. अतुल याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन महिलांविरुद्ध देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पठाण करीत आहेत.
![]()


