नाशिक: धक्कादायक! ५० रुपयांसाठी पतीने केली पत्नीची हत्या
नाशिक (प्रतिनिधी): इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे परिसरातील सांबरवाडी (गणेश वाडी) येथे विवाहित महिलेचा निर्घृण खून झाला आहे.
दारू पिण्यासाठी बायकोने ५० रुपये दिले नाही म्हणून राग आल्याने दारुड्या नवऱ्याने लोखंडी रॉड बायकोच्या डोक्यात मारून बायकोचा निर्घृण खून केला आहे.
याबाबत वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात मयताचा मुलगा राकेश मोरे याने फिर्याद दिली आहे.
या घटने बाबत वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात भादवी कलम ३०२,५०४ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला असून दारुड्या नवऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे यांनी तात्काळ कर्मचारी सोमनाथ बोराडे, निलेश मराठे, गायकवाड, पवार, चौधरी या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. घटनेचे गांभीर्य पाहुन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनीही घटनास्थळी भेट देत तपास कामी सूचना केल्या. पुढील तपास वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीवऱ्हे पोलीस पथक करत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा नक्की वाचा:
Breaking: नाशिक शहरातील दुहेरी खून खटल्यात रवी निकाळजेसह चार जणांना जन्मठेपेची शिक्षा