नाशिक: धक्कादायक; १६ वर्षाच्या मुलाला कोव्हॅक्सिन ऐवजी दिली कोव्हीशील्डची लस आणि मग…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
मात्र नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील पाटोदा या केंद्रावर एका 16 वर्षीय मुलाला कोव्हॅक्सिनऐवजी कोविशील्ड लस दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
या मुलाला देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
ओमीक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यात आज 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस दिल्या जात आहेत. जिल्ह्यात आज २५ आणि शहरात ६ आरोग्य केंद्रांवर करोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. शासनाने लहान मुलांना केवळ कोव्हॅक्सिन लस देण्याचे आदेश दिले आहेत. या लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येतोय.
तर झालेली चूक कोणीही मान्य करत नसून एक मेकावर आरोप केले जात आहेत. जर कोविशील्ड लस द्यायची नव्हती तर तो स्टाक आम्हाला पाठवला का? असा सवाल परिचारिका विचारत आहे. तर दुसरीकडे वरिष्ठ अधिकारी परिचरिकेची चूक असल्याच सांगत आहेत.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9602,9598,9576″]
दरम्यान या मुलाला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. अद्याप त्याला कुठलाही त्रास होत नसल्याचे सांगण्यात आले असून लसीकरण झालेल्या लाभार्थ्याच्या आरोग्यावर काही परिणाम होणार नाही असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.