नाशिक: दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १९ वर्षीय युवक जागीच ठार

नाशिक: दोन दुचाकींची समोरासमोर धडक;  १९ वर्षीय युवक जागीच ठार

नाशिक (प्रतिनिधी): देवळालीगाव येथील घोलप वाडा समोर दोन ऍक्टिव्हा दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक शहरातील 'या' वाहतूक मार्गात ९ नोव्हेंबरपर्यंत महत्वाचा बदल !

देवळालीगाव येथील घोलप वाडा समोर रात्री 12:30 वाजेच्या सुमारास जेलरोड येथील महाजन हॉस्पिटल मागे राहणारा सुजल उपेंद्रसिंग बुंदीले (वय 19) हा युवक देवळाली कॅम्पकडे ऍक्टिव्हा क्र. MH15 GP 2948 वरून जात असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या MH15 GW 9894 या क्रमांकाच्या ऍक्टिव्हाने जोरदार धडक दिली.

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

धडक इतकी भयानक होती की, सुजलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि अतिरक्तस्रावामुळे त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला.

धडक देणारा ऍक्टिव्हा चालक अपघातानंतर गाडी घटनास्थळी सोडून पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे आणि अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. रात्री उशिरा अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790