नाशिक: दुर्दैवी घटना… धावत्या दुचाकीवर हृदयविकाराचा झटका येऊन तरुणाचा मृत्यू

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक: दुर्दैवी घटना… धावत्या दुचाकीवर हृदयविकाराचा झटका येऊन तरुणाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): दुचाकी चालवत असतांना ह्रदयविकाराचा झटका येउन ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे…

तालुक्यातील सोनांबे येथील 30 वर्षीय तरुणाच्या पोटात दुखू लागल्याने दवाखान्यात नेत असताना दुचाकीवरच हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना आज (दि.28) घटना रात्री 8.30 वाजेच्या सुमारास घडली.

अमोल प्रकाश शिरसाठ (30) रा. सोनांबे असे मृत तरुणाचे नाव आहे. सायंकाळी आपल्या राहत्या घरात अचानक अमोलच्या पोटात दुखू लागले. हे त्याने आपल्या घरच्यांना सांगितले असता काका व आई त्याला उपचारासाठी घेऊन दुचाकीवरून रस्त्याने सिन्नरकडे येत होते. काका व आईच्या मधोमध तरुण दुचाकीवर बसला होता.

नाशिक: लोखंडी ॲंगल वाहतूक करणाऱ्या टेम्पोला धडक; सिडकोतील दुचाकीस्वार ठार

घोटी महामार्गावरील बंधन लॉन्सजवळ आल्यावर त्याला हृदयविकाराचा धक्का बसला. काही वेळातच त्याने अंग सोडून दिले. पाठीमागे बसलेल्या आईने कसेबसे त्याला पकडून ठेवत सिन्नरमधील खाजगी रुग्णालयात घेऊन आले. मात्र, डॉक्टरांनी त्यास तपासल्यावर मृत घोषित केले. यानंतर डॉक्टरांकडून नातेवाईकांना सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला.

नाशिक: अल्पवयीन मुलांनी रस्त्यांवर वाहन चालविल्यास पालकांवर होणार कारवाई

मयत अमोल हा आईसोबत सोनांबे गावात वास्तव्याला होता. माळेगाव येथील एका कारखान्यात तो नोकरीला होता. त्यांच्या अचानक मृत्यूने तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790