
नाशिक: दुकानदारांनो सावधान, सुटे पैसे मागण्याच्या बहाण्याने गल्ल्यातील रोकड लांबवली
नाशिक (प्रतिनिधी): दुकानदरांनो सावधान, दिवसभरात अनेकजण सुटे पैसे मागण्याच्या बहाण्याने येत असतात.
पण आता हाच बहाणा करून गल्ल्यातली ३६ हजार रुपयांची रोकड लांबविल्याचा प्रकार घडला आहे.
गॅस शेगडीबाबत विचारपूस करीत सुटे पैसे मागण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन अज्ञात इसमांनी दुकानाच्या गल्ल्यातील ३६ हजार ६०० रुपयांची रोकड लांबविल्याची घटना औरंगाबाद रोड येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, जगदीश गणपत पेखळे (रा. ओढा, औरंगाबाद रोड, नाशिक) यांचे ओढा येथे सिद्धिविनायक गॅस एजन्सीचे ऑफिस आहे.
या ऑफिसमध्ये दि. ५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता महिला कर्मचारी जयश्री प्रशांत वडजे व प्राची दीपक नेवडे या काम करीत होत्या. त्यावेळी दोन अज्ञात इसम ऑफिसमध्ये आले. त्यांनी या महिला कर्मचार्यांकडे गॅस शेगडीबाबत विचारपूस केली, तसेच सुटे पैसे मागून या दोघी महिलांना बोलण्यात गुंतविले.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10383,10381,10375″]
अज्ञात इसमांनी संगनमत करून त्यांचे लक्ष विचलित करून गल्ल्यात असलेली ३६ हजार ६०० रुपयांची रोकड लबाडीच्या इराद्याने चोरून नेली. दरम्यान या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात दोन अनोळखी इसमांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक भुसारे करीत आहेत.