नाशिक: ‘त्या’ बसचे ब्रेक फेल नव्हते! बसचालकाचा जामीन अर्ज फेटाळला

नाशिक: ‘त्या’ बसचे ब्रेक फेल नव्हते! बसचालकाचा जामीन अर्ज फेटाळला

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक-पुणे महामार्गावर गेल्या ८ डिसेंबर रोजी झालेल्या अपघातातील परिवहन महामंडळाच्या बसचे ब्रेक फेल नसल्याचा अहवाल प्रादेशिक परिवहन विभागाच्या तांत्रिक निरीक्षकांनी न्यायालयास दिल्याचे समोर आले.

याच कारणामुले न्यायालयाने बसचालकाचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

या अपघातामध्ये बसच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा आगीत होरपळून बळी गेला होता.

हे ही वाचा:  नाशिक: सणांच्या पार्श्वभूमीवर ६२१ सराईत गुन्हेगारांवर कारवाई, ११ स्थानबद्ध

राजेंद्र अंबादास उईके (रा. राजगुरुनगर, जि. पुणे) असे बसचालकाचे नाव आहे. नाशिक-पुणा रोडवरील पळसे चौफुलीवर गेल्या ८ तारखेला दुपारी सव्वा बाराच्या सुमारास सिन्नरकडून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगात येणार्या खेड डेपोच्या बसवरील (एमएच ०७ सी ७०८१) चालक उईके यांचे नियंत्रण सुटले आणि बसने गतीरोधकावर क्रेटा कारला धडक दिल्यानंतर तीन दुचाक्यांना उडविले.

हे ही वाचा:  नाशिक: खुनातील संशयित 14 महिन्यांनंतर ताब्यात; सिडकोतील 'या' मृत्यूप्रकरणाचा उलगडा !

तसेच, पुढील बसला पाठीमागून जोरदार धडक दिली होती. यावेळी एका दुचाकीवरील दोघे बसच्या चाकाखाली सापडले. त्याचवेळी दुचाक्यांनी पेट घेतला. या आगीत बसखाली अडकलेल्या दोघांचा होरपळून मृत्यु झाला होता. तर, चौघे गंभीररित्या जखमी असून, २५ प्रवासी जखमी झाले होते. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात बसचालकांविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790