🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: जुनी कुरापत काढून चार ते पाच जणांच्या टोळक्याचा युवकावर जीवघेणा हल्ला Video

नाशिक (प्रतिनिधी): किरकोळ वादाची कुरापत काढून चार ते पाच जणांच्या टोळक्याने एका युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना गाडेकर मळा परिसरात घडली. देवळाली गाव भागात म्हसोबा मंदिरामागे असलेल्या हरी श्रद्धा अपार्टमेंट मध्ये रात्री साडेदहाच्या सुमारास शिबान शेख बबलू या २७ वर्षीय युवकावर चार ते पांच जणांनी जीवघेणा हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे.

हरी श्रद्धा अपार्टमेंट मध्ये राहणारा शिबान हा आपल्या घरी जात असताना चार हल्लेखोरांनी हातात तलवारी, कोयते आदी तीक्ष्ण हत्यारांनी जबर वार करून शिबान यास जखमी केले. शिबन शेख बबलू याच्यावर इतके वार झाले की त्याला उठता सुद्धा येत नव्हते, त्याला त्वरित नाशिक रोड येथील जयराम हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवन वृक्षतोड प्रकरणी १७ फेब्रुवारीला सुनावणी, मनपाने लेखी हमी देण्याची मागणी

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी फैसल शफी शेख (वय 25, रा. खोले मळा, नाशिकरोड) याचा भाऊ शिबान शेख बबलू (रा. हरीश्रद्धा सोसायटी, रजा कॉलनी, गाडेकर मळा, नाशिकरोड) व संशयित आमू व इतर चार ते पाच साथीदार यांच्यात रमजानच्या काळात किरकोळ वाद झाला होता. या वादाची कुरापत काढून काल रात्री आमू व त्याच्या साथीदारांनी गाडेकर मळ्यात येऊन वाद घातला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाली. शिबान शेख हा रात्री एका ठिकाणी उभा असताना हे संशयित त्याच्याजवळ आले व त्याच्यावर प्राणघात हल्ला केला.

🔎 हे वाचलं का?:  णमोकार तीर्थ महोत्सव: प्रशासकीय विभागांनी सुरक्षिततेची सर्वतोपरी दक्षता घ्यावी- डॉ. प्रवीण गेडाम

यात शिवान हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्राणघातक हल्ला सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस चौधरी करीत आहेत. नाशिक शहरात जीवघेणे हल्ले, खून, दरोडे, तसेच चोऱ्यांचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढले असून पोलिसांचे गुन्हेगारांवर वचक राहिलेला नसल्याने नागरिक भयभीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790