नाशिक जिल्ह्यातील पहिल्या ‘मिलिटरी गर्ल’चे निधन, वाचा नक्की काय घडलं…

अत्यंत हलाखीची परिस्थितीत गायत्री यांनी रोजंदारी करत देवगाव येथील डी आर भोसले महाविद्यालय शिक्षण घेतल्यानंतर लासलगाव नूतन महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतले.

नाशिक (प्रतिनिधी):  नाशिक जिल्ह्यातील पहिल्या ‘मिलिटरी गर्ल’चे निधन झाल्याने नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली असून जिल्ह्यातून पहिल्यांदाच सीमा सुरक्षा दलात रुजू झालेल्या महिला जवानाचे निधन झाल्याची घटना घडली आहे.

निफाड तालुक्यातील देवगाव येथील गायत्री विठ्ठल जाधव या सीमा सुरक्षा दलात जवान म्हणून कार्यरत होत्या. ट्रेनिंगच्या दरम्यान खड्ड्यात पडून अपघात झाला होता.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातून सीमा सुरक्षा दलात भरती होणारी पहिली महिला जवान गायत्री जाधव होत्या.

अत्यंत हलाखीची परिस्थितीत गायत्री यांनी रोजंदारी करत देवगाव येथील डी आर भोसले महाविद्यालय शिक्षण घेतल्यानंतर लासलगाव नूतन महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतले.

त्यानंतर लासलगाव येथीलच एका खाजगी अकॅडमी ट्रेनिंग घेतले. त्यानंतर त्या 2021 मधील स्टाफ सिलेक्शनच्या सीमा सुरक्षा बलाच्या परीक्षेत पास झाल्या. त्यानंतर राजस्थान येथील अलवर येथे ट्रेनिंगसाठी तिची निवडही झाली. राजस्थानमध्ये ट्रेनिंग पूर्णत्वास जात असताना खड्ड्यात पडून त्यांचा अपघात झाला.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

यावेळी त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान शस्त्रक्रियेनंतर गायत्री ह्या पुन्हा ट्रेनिंगला रुजू झाल्या. मात्र पुन्हा त्रास जाणवू लागल्याने जयपूर येथील एसएम हॉस्पिटलमध्ये पुन्हा मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यानंतर त्या पुन्हा एकदा ट्रेनिंगला रुजू झाल्या. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर बिहार राज्यातील अरिहार जिल्ह्यातील एसएसबी बथनाहा येथील नेपाळ सीमेवर त्यांची नियुक्ती झाली.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

मात्र काहीही दिवसानंतर त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागल्याने त्या सुट्टी घेऊन घरी आल्या. नाशिक येथील दोन खाजगी दवाखान्यात उपचार केल्यानंतर जून महिन्यात मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं. या हॉस्पिटलमध्ये तीन महिने उपचार घेतल्यानंतर पुन्हा त्रास जाणवू लागल्याने अधिक उपचारासाठी एम्स दिल्ली येथे संदर्भ देण्यात आला. मात्र तिथे जाण्यापूर्वी त्यांची तब्येत खालावली. व त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790