नाशिक: कौटुंबिक वादातून पतीचा पत्नीवर व स्वत:वर गोळीबार ; पती जागीच ठार
नाशिक (प्रतिनिधी): कौटुंबिक वाद हा वेळीच थांबला नाही तर तो विकोपाला जाऊ शकतो.
आणि यातूनच होत्याचं नव्हतं होऊन जातं.
असाच प्रकार नाशिक जिल्ह्यात घडला आहे.
येवल्यातील बाजीराव नगर येथे कौटुंबिक वादातून करण्यात आलेल्या गोळीबारात पती जागीच ठार झाल्याची घटना घडली असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज (१४ एप्रिल) रोजी पहाटे येवला शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या पाडेगाव रोड भागातील बाजीराव नगर येथे राहणारे व पाटबंधारे विभागात इन्स्पेक्टर म्हणून नोकरी करणारे किरण आनंदा दुकळे वय ( ४० ) यांनी स्वतःवर गोळी झाडून पत्नीवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या गोळीबारात पती किरण आनंदा दुकळे जागीच ठार झाला असून पत्नी वैशाली दुकळे यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10438,10446,10435″]
दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना समजताच मनमाड पोलिस उपविभागीय अधिकारी समीर साळवे, पोलीस निरीक्षक मथुरे, पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. तसेच पाटबंधारे विभागात नोकरी करणार्या सरकारी व्यक्तीकडे गोळीबार करण्यासाठी बंदूक आली कुठून असा मोठा प्रश्न उभा राहिला असून या घटनेचा पुढील तपास करण्यासाठी तज्ज्ञांना पाचारण करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.