नाशिक (प्रतिनिधी): येथील मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाटातील हॉटेल ऑरेंज समोर आज (दि.०८) रोजी पहाटेच्या सुमारास एका कंटेनरने पिकअप आणि ओमनी कारला धडक दिल्याने अपघात घडला असून या कंटेनरच्या धडकेत दोन जैन महिला साध्वींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे….
याबाबत अधिक माहिती अशी की, कसारा घाटातून नाशिक येथील पवननगर स्थानकात चातुर्मास कार्यक्रमासाठी परमपूज्य सिद्धाकाजी व हर्षाईकाजी या पहाटेच्या सुमारास नाशिकला पायी प्रवास करत येत होत्या.
त्यावेळी एका कंटेनरने पिकअप आणि ओमनी कारला धडक देऊन पायी चालणाऱ्या महिला साध्वींना धडक दिली. या धडकेत दोन्ही महिला साध्वी गंभीर जखमी झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यातील जैन बांधवांमध्ये शोक व्यक्त होत असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
![]()


