नाशिक: उसनवार घेतलेले पैसे देत नसल्याने चार जणांकडून एकाचे अपहरण

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक: उसनवार घेतलेले पैसे देत नसल्याने चार जणांकडून एकाचे अपहरण

नाशिक (प्रतिनिधी): उसनवार घेतलेले पैसे परत केले नाहीत म्हणून एका इसमाचे चार जणांनी संगनमत करून अपहरण करीत त्याला जबरदस्तीने रिक्षात बसवून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: मोटारसायकल स्लिप होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी यांनी उसनवार पैसे घेतले होते. ते पैसे परत केले नाहीत या रागातून चार जणांनी संगनमत करून पीडित इसमाला रिक्षामध्ये जबरदस्तीने बसवून त्याचे अपहरण करीत त्याला मारहाण, शिवीगाळ करीत धमकी दिली, तसेच पीडित इसम हा द्वारका येथून मोटारसायकलीवरून जात असताना या चार संशयितांनी त्याचा पाठलाग करून मोटारसायकल थांबविली व धमकी देऊन शस्त्राने दुखापत केली.

⚡ हे ही वाचा:  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’

नाशिक: केटीएचएमला शिकणाऱ्या १७ वर्षीय तरुणाचा नदीत पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यू…

या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here