🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे वाचले 18 वर्षीय तरुणाचे प्राण ! (व्हिडीओ बघा)

Job Openings in Nashik. Click Here…

नाशिक: आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे वाचले 18 वर्षीय तरुणाचे प्राण ! (व्हिडीओ बघा)

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड रेल्वे स्थानकावर रेल्वेत चढताना युवकाचा तोल जाऊन रेल्वेखाली जाणार्‍या युवकाचा आरपीएफ जवानाने जीव वाचवला आहे. सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  णमोकार तीर्थ महोत्सव: प्रशासकीय विभागांनी सुरक्षिततेची सर्वतोपरी दक्षता घ्यावी- डॉ. प्रवीण गेडाम

नाशिकरोड रेल्वे स्थानकावर पवन एक्स्प्रेस उभी असताना राम मोहरी प्रजापती (वय 18) हा युवक प्लॅटफॉर्म क्र. 2 वर रेल्वेत चढत असताना त्याच्याकडे असलेले सामान गाडीमध्ये टाकत असताना गाडी सुरू झाली. घाईगडबडीत रेल्वेत चढत असताना त्याचा अचानक तोल गेला.

तेथे तैनात असलेले आर. पी. एफ. चे कर्मचारी के. के. यादव यांच्या निदर्शनात आल्यानंतर त्यांनी तरुणाला रेल्वेपासून बाहेर सुखरूप  खेचून काढले.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी ध्वजस्तंभ व पताका रचना आढावा बैठक

हा युवक प्लॅटफॉर्मवर 50 फूट फरफटत गेल्याचे पाहून इतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे युवकाचा जीव वाचल्याने प्रवाश्यांनी समाधान व्यक्त केले. आरपीएफ जवान के. के. यादव यांचे पोलीस निरीक्षक हरपाल सिंह यादव आणि जे. पी. राजपूत यांनी अभिनंदन केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गरवारे ते एक्स्लो पॉइंट वाहतूक मार्गात बदल !

नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: सात जन्म तर दूरच..सात दिवसांत नवरी पळाली भुर्रर्रर्र, नवरा पाहातच राहिला…
नाशिक: बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारायला गेलेल्या भावावर टोळक्याचा कोयत्याने हल्ला
नाशिक: प्रेयसीसोबत असलेल्या नात्यात आईचा अडथळा ठरवत मुलाने उचललं हे टोकाचं पाऊल !

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790