नाशिक (प्रतिनिधी): सिडको परिसरातील युवकाने स्वतःच्या आत्महत्येचा व्हिडिओ बनवत जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना घडली. २१ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेतला. याप्रकरणी अंबड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रथमेश प्रकाश बोरसे (२१) या युवकाने सिम्बॉयाेसिस कॉलेजजवळील निवासी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील घरात गळफास घेत रविवारी आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण समजले नाही. ऐन दिवाळीत तरुणाने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पुढील तपास हवालदार पवन परदेशी करत आहेत.
4 Total Views , 1 Views Today
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790