नाशिक: अश्‍लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार

नाशिक: अश्‍लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; दोन वेळा गर्भपात

नाशिक (प्रतिनिधी): लग्‍नाचे आमिष दाखवून व अश्‍लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार करणार्‍या तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की संशयित आरोपीने पीडित महिलेशी संवाद साधून तिच्याशी ओळख वाढविली.

🔎 हे वाचलं का?:  लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा महत्वाचा निर्णय, आदिती तटकरे यांची पोस्ट नेमकी काय?

त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर संशयित आरोपीने दि. 23 जानेवारी 2020 ते 15 सप्टेंबर 2022 या कालावधीत विहितगाव येथे पीडित महिलेचा पाठलाग केला.

संशयित आरोपीने त्याच्या घरी पीडित महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हा प्रकार त्याने त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.

🔎 हे वाचलं का?:  शिक्षक पात्रता परीक्षा निकाल जाहीर: गुणपडताळणीसह आक्षेप नोंदविण्यासाठी 21 जानेवारीपर्यंत संधी

त्यानंतर हा अश्‍लील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून बदनामी करण्याची भीती पीडित महिलेला घातली, तसेच लग्‍नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करून तिला दोन वेळा गर्भवती केले. त्यानंतर गर्भपात करण्याच्या गोळ्या तिला बळजबरीने खाण्यास देऊन दोन वेळा गर्भपात केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'सूर्यकिरण एअर शो'मुळे २२ व २३ जानेवारीला 'या' वाहतूक मार्गात बदल

दरम्यान, दोन वर्षांपासून लग्‍नाचा तगादा लावूनही आरोपीने लग्‍न केले नाही, तसेच तिच्यावर अत्याचार करून तिला त्रास दिला. वारंवार होणार्‍या या छळाला कंटाळून पीडित महिलेने उपनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790