नाशिक: अवघ्या ४५ मिनिटात अडीच लाखांच्या दागिन्यांवर चोरांनी मारला डल्ला!

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात भुरट्या चोऱ्या, वाहनचोरी, आणि चेन ओढणे यांचे सत्र काही थांबतांना दिसत नाहीये.

घरमालक बाहेरगावी असतांना झालेल्या चोऱ्यांबाबत आपण अनेकदा ऐकलं असेल.

पण नाशिकमध्ये अवघ्या ४५ मिनिटात चोरट्यांनी बंद घरातून चोरी केल्याची घटना घडली आहे.

यामुळे आता पोलिसांसमोरसुद्धा आव्हान उभं राहिलं आहे.

हे ही वाचा:  नाशिक: कुंभमेळ्यातील गर्दी नियोजनासाठी सूक्ष्म नियोजन करावे- अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल

पाथर्डी फाट्यानजीकच्या वासननगर भागात बुधवारी (दि. ३०) भरदिवसा बंद प्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी अवघ्या ४५ मिनिटांत अडीच लाखांचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: डॉमिनोज पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये तोडफोड करणाऱ्या तिघांना अटक !

शिवलेखा अपार्टमेंट येथील रहिवासी संजय रमेश जवरे (रा. वासननगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या पत्नी सुप्रिया जवरे या मंगळवारी दुपारी ३.३० च्या सुमारास फ्लॅटला कुलूप लावून शेजारी गेल्या होत्या. त्यानंतर त्या ४५ मिनिटांनी परतल्या असता त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले. घरात बघितले असता कपाटातून रोख रकमेसह तब्बल अडीच लाखांचे दागिने चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरीच्या घटना लक्षात घेत इंदिरानगर पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790