🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: अपघाताचे सत्र सुरुच; दोन अपघातांमध्ये एका बस प्रवाशासह दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक: अपघाताचे सत्र सुरुच; दोन अपघातांमध्ये एका बस प्रवाशासह दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात काही केल्या अपघातांचे सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये…

वेगवेगळया ठिकाणी झालेल्या दोन अपघातामध्ये एका बस प्रवाशासह दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

पहिला अपघात बसमधून उतरत असतांना मोटारासायकलने धडक दिल्याने प्रवाशाचा झाला तर दुस-या अपघातात जेसीबीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

याप्रकरणी आडगाव आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गोदावरी जन्मोत्सवानिमित्त आज (दि. ३१) शहरातील 'या' वाहतूक मार्गात बदल

पहिला अपघात पाथर्डी शिवारात झाला. अंकुश डमाजी उंदिखाडे (३६ रा.पाथर्डी गौळाने रोड,पाथर्डी गाव) हा दुचाकीस्वार अतुल ब्राम्हणे या मित्रास डबलसिट बसवून आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला.

दोघे मित्र आपल्या घराकडे दुचाकीवर जात असतांना पाथर्डी वडनेर मार्गावरील पाथर्डी गाव सर्कल येथे भरधाव जेसीबी आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालक उंदिखाडे गंभीर जखमी झाला होता. त्यास तात्काळ सिग्नस हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉ.पुष्कराज भोळे यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार आर.के.शेख करीत आहेत. तर दुसरा अपघात माडसांगवी टोलनाका भागात झाला. अमृतधाम भागातील विजय गुलाबराव बोरसे (३२ रा.गंगोत्री विहार,बिडीकामगार नगर) हा युवक गेल्या मंगळवारी (दि.७) सायखेडा येथून येणा-या सिटीलिंक बसमधून उतरत असतांना पाठीमागून आलेल्या दुचाकीने त्यास जोरदार धडक दिली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ढगाळ वातावरणामुळे ओसरलेली थंडी पुढील दोन दिवसांत परतणार

हा अपघात माडसांगवी टोलनाका भागात झाला होता. या अपघातात प्रवासी तरूण गंभीर जखमी झाल्याने त्यास समृध्दी हॉस्पिटल येथे दाखल केले असता शुक्रवारी रात्री उपचार सुरू असतांना डॉ.तृप्ती हिरवाळे यांनी त्यास मृत घोषीत केले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार टी.के,गायकवाड करीत आहेत.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याचे परिपूर्ण दस्तऐवजीकरण करावे - केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत

नाशिक कॉलिंगच्या फोलोअर्ससाठी Exclusive Coupon. Download करा

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790