नाशिक: अजित पवारांबद्दल मी काल जे बोललो त्याचा खेद वाटतो- संजय राऊत

नाशिक: अजित पवारांबद्दल मी काल जे बोललो त्याचा खेद वाटतो- संजय राऊत

नाशिक (प्रतिनिधी): अजित पवार यांच्याबद्दल मी काल जे काही बोललो आहे, त्याचा मला खेद वाटतो. मी असे बोलणे योग्य नाही, असे मत व्यक्त करत खासदार संजय राऊत यांनी माघार घेतली. त्यामुळे ‘मविआ’ मध्ये शनिवारी दोन नेत्यात जुंपलेले शब्दयुद्ध थंड झाल्याचे दिसून येत आहे.

संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, माझा आणि अजित पवार यांचा स्वभाव थोडा हॉट असल्याने आम्ही दोघे पटकन व्यक्त होतो. अजित पवारांबद्दल मी जे बोललो त्याचा मला खेद वाटतो. यापुढे मी ठरवलं संपूर्ण भूमीका ऐकल्याशिवाय मी त्याविषयावर बोलणार नाही. अजित पवार हे मविआतील अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. असे विधान राऊत यांनी केले. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत धनुर्विद्या अकादमीच्या खेळाडूंची चमक; दोन रौप्यपदकांची कमाई

आंदोलन करणाऱ्यांनी आधी उत्तरे द्यावी:
माझ्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना मला एकच सांगायचे आहे की, माझा विरोध हागद्दार आणि बेईमान या प्रवृतीविषयी. त्यावर त्यांचे काय मत आहे, ते त्यांनी स्पष्ट करावे. सावरकरांनी देखील देशाविरोधात काम करणाऱ्या गद्दाराविरोधात थुंकले होते. मग मी वीर सावरकरांचा आदर्श घेतला तर त्यात वाईट काय? मुळात गद्दारांची नावे आले की, माझी जिभ दाताखाली येते. हे अगदी स्पष्ट झाले आहे. गद्दारांना असे वाटते की, भविष्यात आम्हाला रस्त्यावर फिरणे अवघड होईल. म्हणून ते माझ्याविरोधात आंदोलन करत आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: महसूल विषयक समस्या तात्काळ सोडविण्यासाठी समाधान शिबिरे प्रभावी- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

मोदींचा तुलना थेट स्टॅलिनशी, इतिहास संपवण्याचे काम:
कायदा आणि लोकशाहीच्या मुखवट्याखाली ज्या पद्घतीने कर्मकांड केले जातेय. कायद्याचे गैरवापर करून सरकार पाडले जाताहेत, वेगाने काम झालं, 50- 50 खोके देऊन सरकार पाडल जातंय, वेग काय आहे लवकरच कळेल, निवडणूका घ्या- मग कळेल कोणाचा किती वेग आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील भाविकांच्या बसला कानपूरजवळ अपघात; एकाचा मृत्यू

समर्थकांचा अतिउत्साह असतो:
नाना पटोले यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून भावी मुख्यमंत्री असे पोस्टर लावले जातात. त्यात समर्थकांचा अतिउत्साह असे म्हणावे लागले. त्यांना कोणी सांगत नसते की, बॅनरबाजी करा म्हणून, असे मत राऊतांनी व्यक्त केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790