नाशिक: अंत्यविधीसाठी जमलेल्या लोकांना भरधाव कारने उडवलं; अमरधाम येथील घटना

नाशिक (प्रतिनिधी): गणेशवाडीकडून द्वारकाकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या मद्यधुंद कार चालकाने नाशिक अमरधामसमोर मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अंत्यविधीसाठी जमलेल्या लोकांना धडक दिली.

या धडकेत सिटी लिंक बससेवेचे सहा वाहक जखमी झाले आहेत. नाशिकमधून अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. या घटनेत अंत्यविधीसाठी आलेल्या दहा जणांना भरधाव कारने (एम.एच. ०५, ए.एक्स. ३९५७) धडक दिली. नाशिकच्या अमरधाम समोर ही घटना घडली आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत.

हे ही वाचा:  बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून

भद्रकाली हद्दीच्या जुन्या नाशकातील मध्यरात्रीच्या या घटनेचा थरार हा अक्षरशः थरकाप उडवणारा होता. शितळादेवी मंदिरासमोरील अमरधामला सिटी लिंक बस वाहकाच्या अंत्यविधीसाठी आलेल्या दहा जणांना भरधाव वेगानं आलेल्या कारनं समोरून जबर धडक दिल्याची घटना घडली. या घटनेत रस्त्यावर उभे असलेले सिटी लिंक बसचे सहा वाहक जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हे ही वाचा:  नाशिक: शहरात महावितरणचे छापे; वीज चोरीचे गुन्हे दाखल !

सिडकोतील रहिवासी आणि सिटीलिंक बसवाहक असलेल्या मकरंद पंचाक्षरींचा मृत्यू झाल्यानं मध्यरात्री त्यांच्या अंत्यविधीसाठी नाशिक अमरधामला अनेक सिटीलिंक कर्मचारी आले होते. त्यातील काहीजण बाहेर रस्त्यावर उभे असताना पंचवटी अमरधामकडून नानावलीकडे भरधाव वेगानं जाणारी कार समोर उभा असलेल्या घोळक्यावर जाऊन धडकली.

या अपघातात रोहित काटे, निखील सोनवणे, वैभव सुरेश जाधव, कृष्णा राकेश गाडे, जयंत जगदीश गायकवाड, पंकज रतन चौधरी आणि भगवान कैलास पाटील हे जखमी झाले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

भद्रकाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत सपकाळे, यासह कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. जखमी नागरिकांना खाजगी वाहनात बसवून जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचारसाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची घटना घडल्यानंतर परिसरात नागरिकांचा मोठा जमाव जमला होता.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790