नाशिक (प्रतिनिधी) : शहरातून हैदराबाद, बंगळूरू, अहमदाबाद, दिल्ली व पुणे या शहरांसाठी ३ कंपन्यांकडून विमानसेवा सुरू आहे. तर, आता यामध्ये बेळगावचा ही समावेश होणार आहे. तसेच स्पाइस जेटकडून सुरू असलेल्या दिल्ली व हैदराबाद विमानसेवेमुळे नाशिककरांना देशामधील आणखी २८ शहरांचे कनेक्ट उपलब्ध झाले आहे.
नाशिकमधून सुरू असलेल्या हैदराबाद आणि दिल्ली विमान सेवांना २८ शहरे कनेक्ट केल्याने नाशिकहून आता थेट या शहरांमध्ये पोहोचता येणार आहे. म्हणून, नाशिककरांना पर्यटन, उद्योग व व्यवसाय अशा महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये मोठा फायदा होणार आहे. तर, पर्यटनाच्या दृष्टीने मागणी करण्यात आलेल्या लेह, मनाली, तिरुपती, उदयपूर, धर्मशाळा, विशाखापट्टनम, श्रीनगर, यांचा ही २८ शहरांमध्ये समावेश आहे.
तर, अजमेर, अमृतसर, बागडोगरा, दरभंगा, डेहराडून, दुर्गापुर, ग्वालियर, जालंधर, जबलपूर, झारसुगुडा, रांची, पटना, विजयवाडा या शहरांचाही यामध्ये समावेश आहे. त्यामुळे नाशिककरांसाठी अवघ्या काही तासांमध्ये देशातील शहरांसाठी प्रवास शक्य असून, ही जणू पर्वणीच आहे.