नाशिकला स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापास जन्मठेप
नाशिक (प्रतिनिधी): स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापास जन्मठेप व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
नाशिक शहरातील पंचवटीत गेल्या वर्षी हा धक्कादायक प्रकार घडला होता..
या खटल्याचा तपशील असा की, दि. 9/4/2021 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास पंचवटीच्या एका भागातील 40 वर्षीय इसमाने आपल्या स्वतःच्या मुलीवर बलात्कार केला.
याप्रकरणी सदर पीडित बालिकेने पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून त्याच्या विरुद्ध बलात्कार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला.
महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री पाटील यांनी चिकाटीने तपास करून आरोपी विरुद्ध जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. न्यायमूर्ती श्रीमती एम. व्ही. भाटिया यांच्या समोर या खटल्याची सुनावणी होऊन आरोपी विरुद्ध गुन्हा शाबीत झाल्याने जन्मठेप व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून श्रीमती रेवती कोतवाल यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार एम. एम. पिंगळे व कोर्ट अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. डी. कडवे यांनी पाठपुरावा केला.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: चहा पितांना ठसका लागून इंजिनीअरिंगच्या युवकाचा मृत्यू
नाशिक: फादर्स डे साजरा करण्यासाठी तलवारीने केक कापला.. आता रवानगी थेट तुरुंगात…