नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचे 2 रुग्ण आढळले
नाशिक (प्रतिनिधी): शहरात पावसापाठोपाठ आता साथीच्या आजारांच्या उद्रेक होण्याची भीती निर्माण झाली आहे.
मागील पाच दिवसात डेंगी चार, स्वाईन फ्लू दोन, चिकूनगुनियाचा एक रुग्ण आढळून आल्याने पूरस्थितीनंतर आता वैद्यकीय विभागाची जबाबदारी वाढली आहे.
शहरात कोरोना परिस्थिती गंभीर असल्याने इतर आजारांकडे नागरिकांचे लक्ष जात नव्हते.
मात्र, कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर डेंगी, चिकूनगुनिया, स्वाईन फ्लू या पारंपरिक आजारांनी डोके वर काढण्यास सुरवात केली आहे.
- Breaking: नाशिक शहरात २७ जुलैपर्यंत जमावबंदी आदेश लागू… हे आहेत नियम…
- Breaking: सप्तश्रुंगी देवी मंदिर पुढील दीड महिना बंद राहणार, मंदिर ट्रस्टचा निर्णय
जुलै महिन्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या दोन, डेंगीच्या रुग्णांची संख्या चार, तर चिकूनगुनियाचा एक रुग्ण सापडला आहे. पावसामुळे साथीचे आजार वाढण्याची शक्यता असल्याने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे. डेंगी, स्वाईन फ्लू व चिकूनगुनियाच्या लक्षणांमध्ये साम्य आढळून येत आहे. थंडी, ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, मळमळ, उलटी, जुलाब, पोटदुखी ही सारखीच लक्षणे असल्याने नागरिकांनी अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.