नाशिकमधील कामगार नेत्याच्या मुलाचा विदेशात इमारती वरून पडून दुर्दैवी मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): येथील प्रेस कामगार नेत्याच्या कझाकिस्थान येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलाचा इमारती वरून पडून दुर्दवी मृत्यू झाला असून कामगार आणि सातपूर, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालय(आय एस पी)प्रेस कामगार नेते, वर्क्स कमिटी चे सदस्य डॉ चंद्रकांत हिंगमीरे यांचा मुलगा ओंकार चंद्रकांत हिंगमीरे हा रशिया देशा नजीक असलेल्या कझाकिस्थान देश या ठिकाणी MBBS या वैद्यकीय शिक्षणनाच्या पाचव्या म्हणजे शेवट च्या वर्षी साठी शिकत होता. आणि कॉलेज च्या जवळच एका इमारती मध्ये सहाव्या मजल्यावर पाच नाशिक येथील मित्रांसह तो एकत्र राहत होता.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याचा खून करणाऱ्या संशयिताला कोठडी

अत्यंत हुशार आणि चिकाटी असलेल्या ओंकार याचा गेल्या२६एप्रिल ला लागलेल्या चौथ्या वर्षाच्या निकालात तो प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्या मुळे तो आणि परिवार सदस्य अतिशय आनंदी होते. काही दिवसात सुट्टी लागणार असल्याने ७जून रोजी तो नाशिक येथे घरी येणार होता, त्या साठीची विमान तिकीट बुक केले होते.मात्र नियतीने त्याचा वर घाला घातला आणि ५मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सहाव्या मजल्यावरून पडून ओंकार चा दुर्दवी मृत्यू झाला.

हे ही वाचा:  नाशिक: खुनातील संशयित 14 महिन्यांनंतर ताब्यात; सिडकोतील 'या' मृत्यूप्रकरणाचा उलगडा !

घटनेची माहिती मिळताच प्रेस कामगार नेते, यांनी डॉ हिंगमीरे यांच्या निवासस्थानी धाव घेतली, कामगार नेते जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी ओंकार यांचा मृतदेह नाशिक ला आणण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याशी संपर्क साधला. खा. गोडसे यांनी कझाकिस्थान देशा मधील आपल्या राजदूत यांचा बरोबर पत्रव्यवहार केल्याचे समजते.

डॉ चंद्रकांत हिंगमीरे यांना दोन मुले होते. मोठा मुलगा यश हा MBBS चे शिक्षण पूर्ण करून लंडन येथे MS चे शिक्षण घेत आहे. भावाच्या निधनाचे वृत्त समजताच डॉ. यश याने नाशिक कडे धाव घेतली.

हे ही वाचा:  नाशिक: सणांच्या पार्श्वभूमीवर ६२१ सराईत गुन्हेगारांवर कारवाई, ११ स्थानबद्ध

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790