नाशिकचा वीर जवान शहीद

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील माणके-चिखलओहोळ येथील रहिवासी देशसेवेचे कर्तव्य बजावत असलेले वीर जवान शहीद झाले. मनोराज सोनवणे असे त्यांचे नाव आहे. मनोराज सोनवणे हे सोळा वर्षांपासून भारतीय लष्करातील मराठा बटालियन मध्ये कार्यरत होते. २१ पॅराट्रप या स्पेशल फोर्स मध्ये भारताच्या सीमेवर अरुणाचल प्रदेशात अधिक उंचावर कर्तव्य बजावत असतांना त्यांची तब्येत खालावली. त्यानंतर त्यांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या निधनाने देशाने वीर जवान गमावला आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ २०२७ पूर्वी कुशावर्त कुंडासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790