नाशकात रे’व्ह पार्टीचा धांगडधिंगा; बिग बॉस फेम अभिनेत्रीसह 22 जणांना अटक
नाशिक (प्रतिनिधी): मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी होत असला तरी अद्याप कोरोना विषाणूचा धोका कमी झालेला नाही. मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर अशा शहरात पुन्हा कोरोना रुग्ण वाढीचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं असून कोरोना निर्बंध पुन्हा लागू करण्यात येत आहेत. असं असताना काही नागरिकांकडून सर्हासपणे कोरोना नियम पायदळी तुडवले जात आहेत. लग्न समारंभ आणि विविध पार्ट्यांसाठी लोकं मोठ्या संख्येनं एकत्र येत आहेत.
अशातच इगतपुरी याठिकाणी सुरू असलेल्या एका रे’व्ह पार्टीचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुंबई -आग्रा महामार्गावरील मानस रिसॉर्टमधील स्काय ताज व्हिलातील दोन बंगल्यात रे’व्ह पार्टीचा धांगडधिंगा सुरू होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिक्षक सचिन पाटील यांनी आपल्या पोलीस पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकला आहे. यावेळी अनेकजण एकत्र येऊन म’द्यधुंद अवस्थेत धांगडधिंगा करताना दिसले आहे.
या रे’व्ह पार्टीत 10 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश होता. यातील काही पुरुष आणि काही महिला मा’दक पदार्थांचं सेवन करत बिभ’त्स अवस्थेत आढळून आल्या आहेत. यातील चार तरुणी या चित्रपट सृष्टीशी संबंधित असल्याची माहितीही समोर आली आहे. यातील काही महिला बॉलिवूडशी संबंधित आहे,त तर काही दक्षिणात्य चित्रपटसृष्टीशी संलग्न आहेत. शिवाय एका अभिनेत्रीनं बिग बॉस या ‘रिअॅलिटी शो’ मधील माजी स्पर्धक आहे. यामध्ये एका इराणी महिलेचा देखील समावेश आहे.
याप्रकरणी पोलिसांनी छापा टाकल्यानंतर, ट्रायपॉड, कॅमेरा आणि मा’दक पदार्थ जप्त केले आहेत. सर्व आरोपींना ताब्यात घेतलं असून कोरोना नियमाच्या उल्लंघनासोबत, अवै’धरित्या पार्टीचं आयोजन करणे, अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वे’श्याव्यवसा’याच्या अंगाने देखील या घटनेचा तपास केला जात आहे.