नवरात्रोत्सवात वणी गडावर जायचं असेल तर ही आहे अट…
नाशिक (प्रतिनिधी): येत्या ७ तारखेपासून नवरात्रोत्सवासाठी सप्तशृंगी देवी मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले राहणार असून भाविकांना पास अनिवार्य असेल.
कोविड प्रतिबंधक दोन्ही लस घेतलेले प्रमाणपत्र, ७२ तास अगोदर केलेल्या आरटीपीसीआर टेस्टचा अथवा २४ तासांच्या आत केलेल्या ॲंटिजेन टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे. तसेच यात्रा रद्द करण्यात आली आहे.
नवरात्रोत्सवादरम्यान तसेच कोजागरी पौर्णिमेमुळे १८ व १९ ऑक्टोबरलाही खासगी वाहाने गडावर नेता येणार आहे. एसटी बसेसमध्ये ५० टक्के प्रवासी क्षमतेने वाहतूक. ऑनलाइन पास शक्य नसल्यास नांदुरी येथील बुथवरून मिळेल. कोविडच्या नियमावलीनुसार फेनिक्यूलर ट्रॉली सुरू राहील. पायी दर्शन रस्त्याला १२ ठिकाणी बारी. दर्शनासाठी फेनिक्यूलरमधील भाविकांना ३० तर पायरीने दर्शन घेणाऱ्या भाविकांना ७० टक्के प्राधान्य.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”8420,8405,8395″]
प्रांताधिकारी विकास मीणा यांनी ट्रस्टच्या हॉलमध्ये आढावा बैठक घेतली. तहसीलदार बंडू कापसे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड, पोलिस निरीक्षक समाधान नागरे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, राजेश गवळी आदींसह सरपंच, उपसरपंच, विश्वस्त, सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.