धक्कादायक: नराधमाने केले १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथे एका १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
ओळखीचा फायदा घेत या नराधमाने वेळोवेळी अत्याचार केले.
ही बाब मुलीच्या आई आणि वडिलांच्या लक्षात आल्याने या नराधमाविरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली.
या तक्रारी वरून पोलिसांनी पोस्को (बाल लैंगिक प्रतिबंध कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पिंपळगाव बसवंत येथील वीट भट्टी परिसरात १३ वर्षीय बालिका तिच्या आई वडिलांसोबत राहत आहे. जवळच राहणारा संशयित आरोपी शकील शब्बीर पिंजारी (वय २३) याने ओळखीचा फायदा घेत १३ वर्षीय बालिकेवर बळजबरीने अत्याचार केला. याबाबत आई वडिलांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तत्काळ संशयित आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक कुणाल सपकाळे करत आहेत.