धक्कादायक: एका विहिरीत दीर- भावजयीचा तर दुसरीमध्ये तरुणाचा मृतदेह

धक्कादायक: एका विहिरीत दीर- भावजयीचा तर दुसरीमध्ये तरुणाचा मृतदेह

नाशिक (प्रतिनिधी): निफाड तालुक्यातील देवगाव येथील एका विहिरीत दीर व भावजयीचा तर दुसऱ्या विहिरीत एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

तिन्ही मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून लासलगाव पोलिस तपास करत आहेत.

याबाबत लासलगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, देवगाव येथील पोटे वस्तीनजीक मंगळवारी सकाळी विहिरीमध्ये पायल रमेश पोटे (२०) या महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

देवगावचे पोलिस पाटील सुनील बोचरे यांनी लासलगाव पोलिसांना कळविले असता सहायक निरीक्षक राहुल वाघ यांनी लहानू धोक्रट, पोलिस नाईक संदीप शिंदे, औदुंबर मुरडनर यांच्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10543,10545,10551″]

मृत महिलेचे माहेर वैजापूर तालुक्यातील चोर वाघलगाव येथील आहे. घटना समजताच तिचे नातेवाईक येईपर्यंत मृतदेह काढण्यास उपस्थितांनी विरोध केला. नातेवाईक आल्यानंतर मृतदेह काढण्यात आला. नातेवाइकांचा आक्रोश व संताप बघता परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांची अधिक कुमक मागवून घेण्यात आली. सहायक निरीक्षक राहुल वाघ यांनी कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिल्याने मृतदेह चिकित्सेसाठी निफाड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यानंतर दुपारी याच विहिरीत पुरुषाच्या चपला तरंगत असल्याने विहिरीत अजून कुणी आहे का? हे शोधण्यासाठी पाण्याचा उपसा करण्यात आला. त्यानंतर गाळात फसलेला मृतदेह हा मृत आढळलेल्या महिलेचाच दीर संदीप एकनाथ पोटे (२७) याचा असल्याचे आढळले.

हे ही वाचा:  नाशिक जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज; अशी आहे तयारी...

दीर व भावजई असे दोघांचे मृतदेह एकाच विहिरीत आढळून आले. मृत महिलेच्या पश्चात सहा महिन्यांची मुलगी, पती, सासू, सासरे असा परिवार आहे. तिचा पती दोंडाईचा येथे एका रेल्वे ठेकेदाराकडे कामास आहे. दोघांच्याही मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, दुसऱ्या घटनेत देवगाव परिसरातील कासली शिवारात एका विहिरीनजीक मोटारसायकल, मोबाइल, चपला आढळून आल्याने विहिरीतील पाण्याचा उपसा केला असता प्रणित दत्तात्रय बोचरे (२२, रा. देवगाव) याचा मृतदेह आढळला. या दोन वेगवेगळ्या घटनांनी देवगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा:  बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून

लासलगाव पोलिस ठाण्यात या दाेन्ही घटनांची नोंद करण्यात आली आहे. देवगाव शिवारातच गेल्या आठ दिवसांपूर्वी बकऱ्या खरेदी-विक्री करणाऱ्या व्यवसायिकाचा खून करण्यात आला होता. देवगाव फाटा परिसरातच सहा महिन्यांपूर्वी मालेगाव तालुक्यातील एका जाेडप्याचा मृतदेह आढळला होता.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790