नाशिक: तलवारीने केक कापायला गेले, सेलिब्रेशन झालं पोलीस कोठडीत..
नाशिक (प्रतिनिधी): वाढदिवसाचा केक तलवारीने कापणाऱ्या तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने गंजमाळ येथे ही कारवाई केली.
नाझीम बाबर खान, असिफ रउफ शेख व सूरज सीताराम शेवरे (रा. श्रमिकनगर, गंजमाळ) अशी या संशयितांची नावे आहेत. केक कापल्याचा फोटो पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर तत्काळ कारवाई करत संशयितांना अटक केली.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”8640,8647,8658″]
संशयितांकडून चार चार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. या संशयितांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गंजमाळ परिसरात राहणाऱ्या सराईत गुन्हेगारांनी रस्त्यात वाढदिवसाचे सेलिब्रेशन साजरे करत चक्क तलवारीने केक कापला होता. रस्त्यावर वाढदिवस साजरा करताना काही जागरूक नागरिकांनी हे फोटो वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांना पाठवले होते. फोटोची दखल घेत संशयितांचा माग काढत तिघांना अटक केली. वरिष्ठ निरीक्षक ढमाळ,रवींद्र बागूल, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, दिलीप मोंढे, फय्याद सय्यद, असिफ तांबोळी यांच्या पथकाने उपआयुक्त संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.