नाशिक (प्रतिनिधी) : सोशल मीडियावर ऑनलाईन एप्लिकेशन्स वापरतांना लोकांकडून पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने अनेकांना त्याचे तोटे सहन करावे लागत आहे. मागील महिन्यामध्ये अशीच एक घटना घडली. सोशल मीडियावर चॅटिंग करताना व्यावसायिक ऑर्डरचे आमिष दाखवून १९ लाखांची फसवणूक करणाऱ्या नयझेरियन संशयित व्यक्तीला दिल्लीमध्ये पकडण्यात नाशिक पोलिसांना यश आले.
हे प्रकरण एका डेटिंग ऍप वरून सुरू झाले. मोनिका सिंह या महिलेच्या नावाने चालवणाऱ्या खात्यावरून नाशिकमधील एका व्यक्तीला व्हॉट्सअॅप तेल कंपनीला नेदरलँडला ऑईल पाठविण्याच्या कारणाने मोठ्या ऑर्डरचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे हे प्रकरण आहे. मोनिका सिंह नावाच्या महिलेने तिची ओळख अॅमस्टरडॅम येथील रहिवासी असून बोर पॅड फार्मासिस्ट कंपनीमध्ये असिस्टंट प्रॉडक्शन पदावर काम करत असल्याचे भासवून विश्वास निर्माण करून त्या व्यक्तीस भरीस पाडले. भरपूर आर्थिक फायदा होईल असे सांगून नंदी यांना त्या महिलेने अडकवले. वेगळ्या व्यक्ती आणि जागांची नावे सांगून संशयित महिलेने २०० लिटर ऑईलची ऑर्डर दिली. त्यानंतर फिर्यादीचा विश्वास संपादन करून वेगवेगळ्या खात्यांमध्ये १९ लाख रुपये व्यवहार करून फसवणूक केली.