नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील जुन्या नाशिक परिसरात २ लाख ६४ हजार ३८ रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, ही कारवाई अन्न औषध प्रशासन आणि भद्रकाली पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात आली आहे.
आरोग्यासाठी घातक असलेल्या पानमसाला, सुगंधी सुपारी, गुटखा इत्यादी या कारवाई दरम्यान हस्तगत करण्यात आले. अन्न औषध प्रशासन यांना या संदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, या विभागाने पळत ठेवत सापळा रचून, गुटखा कारवाई केली. तसेच या अगोदर देखील काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणाहून ३३ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. त्यानुसार, अन्न औषध प्रशासनाने छापेमारी करत लाखोंच्या गुटख्यावर कारवाई केली असे असले तरी दुसऱ्या बाजूला पानटपऱ्यांवर, दुकान इत्यादी ठिकाणी गुटखा सर्रास विक्री केला जातो. यामुळे अन्न औषध प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे का ? असा प्रश्न उभा राहतो.