जिल्ह्यात आजपर्यंत ८७ हजार ६४४ रुग्ण कोरोनामुक्त ; ४ हजार १३२ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी) : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज (दि.३१) प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ८७ हजार ६४४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ४ हजार १३२ रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये ३१० ने घट झाली आहे.  आत्तापर्यंत १ हजार ६६७  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ २०२७ पूर्वी कुशावर्त कुंडासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण :

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १८२, चांदवड ४८, सिन्नर ४३०,दिंडोरी १३४, निफाड २९३, देवळा ३५, नांदगांव ७८, येवला ३६, त्र्यंबकेश्वर २२, सुरगाणा ०४, पेठ ००, कळवण २३,  बागलाण ४३, इगतपुरी ५६, मालेगांव ग्रामीण ६६ असे एकूण १  हजार ४५०  पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार ५४६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ११४  तर जिल्ह्याबाहेरील २२ असे एकूण ४  हजार १३२  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ९३  हजार ४४३  रुग्ण आढळून आले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ २०२७ पूर्वी कुशावर्त कुंडासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी :

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९२.३४,  टक्के, नाशिक शहरात ९४.४८  टक्के, मालेगाव मध्ये  ९३.२३  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९१.६० टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९३.७९  इतके आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ २०२७ पूर्वी कुशावर्त कुंडासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प

मृत्यु :

नाशिक ग्रामीण ५९८, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ८६५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १६६  व जिल्हा बाहेरील ३८  अशा एकूण १ हजार ६६७  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

(वरील आकडेवारी आज (दि.३१) सकाळी ११.०० वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790